शब्दातीत
का कोणास ठावूकतू समोर आलीस आणि आजशब्दांनी मनात फेर धरला !तशी तू रोजच भेटतेस, कधी प्रत्यक्ष... कधी अप्रत्यक्ष,कधी अस्पर्श, कधी स्पर्श भरून...कधी तशीच...आज तू भेटलीस...वेगळीच भासलीस...तारा छेडल्याच...मग कुठून सुरू करू?सारे मला शब्दप्रभू म्हणतात पण... सालं आज शब्दच फितूर!पण तरीही कविता करायची इच्छा आहेच.तुझे भुरभुरणारे केस...थरथरणारे ओठ...गुलाबी गाल...भाव विभोर का काय म्हणतात ते डोळे...सारं सामावून घेणारी नजर...च्या मारी सुचायला लागलं की,पण किती दमछाक !जावू दे... कशाला गुंतून पडाउपमा, अलंकार, विशेषणात...सौंदर्य अनुभवायचं सोडूनमी विडावलोयते शब्दांत पकडायला...पण खरं सांगूअवखळ वारा...उधाणलेला दर्या......आणि बेलगाम मन...कधी मावलंय का शब्दांत.तू ही तशीच अमर्याद...शब्दातीत
2 comments:
छान! नेहेमीचेच शब्द आहेत. रोजच्या वापरातले... पण मांडणी मस्त जमली आहे... keep it up!
आवडली ही पोस्ट. कधी कधी सुंदरता अनुभवायची. स्वत:ला तिच्या स्वाधीन करून टाकायचे.
बरेच दिवस झाले नविन काही लिहीले नाहीस.
Post a Comment