Sunday, March 7, 2010
"ती'
.........
.........
.........
पत्राच्या वरच्या मायन्यामध्ये सुरवातीला काही ओळी रिकाम्या सोडल्यात त्याला कारण तेथे काय लिहायचे हे सुचलेले नाही असं नाही तर तेथे किती आणि काय-काय लिहायचं यावरून माझ्या मनात प्रचंड गोंधळ माजलेला आहे. खरं तर खूप काही लिहावं, व्यक्त व्हावं, भावनांना वाट मोकळी करून द्यावी असं वाटूनही मी त्यांना बांध घालण्याचा प्रयत्न केलाय कारण तेथे वापरावयाचे शब्दच माझ्यावर रुसलेत ते मला फितूरच होत नाहीत. मग मी तो प्रयत्न सोडून दिलाय. आता तुम्ही म्हणाल असं काय बुवा तेथे लिहिणार होतास?
-------------
खरं तर मीही तोच विचार करतोय, आपण तेथे काय लिहिणार होतो? कारण मी जे लिहायचा विचार करतोय ते शब्दबद्ध करू शकेन हा विश्वासच माझ्या ठायी उरलेला नाही. तिच्याबद्दल मी विचार करू लागतो आणि "ती' मला असंख्य रुपात भेटू लागते आणि मग त्यातल्या कोणत्याच रुपाला मी न्याय देऊच शकत नाही याची जाणीव मला मागे खेचून घेते कारण....
-------------
"ती' अंबिका..."ती' दुर्गा..."ती' सरस्वती..."ती' रणचंडिका..."ती' सीता..."ती' मंदोदरी..."ती' अहल्या..."ती' द्रौपदी..."ती' जिजाऊ..."ती' सारा पुराण व्यापून राहिलेली त्यागाची मूर्ती..."ती' देशासाठी रक्त सांडलेली कणखर इंदिरा, "ती' डेअरर किरण बेदी..."ती' वात्सल्यमूर्ती मदर तेरेसा..."ती' अनेक श्वासांना थबकवणारी गानकोकिळा लता..."ती' आयर्न लेडी..."ती'....ही यादी खूप मोठी आहे...वाढतच राहणारी आहे...शब्दांत न मावणारी.
--------------------------
पण तरीही "ती'
माझी जन्मदात्री, वात्सल्यसिंधू, माझी दिशादर्शी, माझ्या पाऊलखुणा जपणारी, या जगाची ओळख करून देणारी, मुक्त विहरण्यासाठी माझ्या पंखांत बळ भरणारी, माझ्या यशासाठी कण कण झिजलेली आणि माझ्या इवल्याशा यशानेही यशाने आनंदून तृप्त होणारी आणि खूप्प काही... माझी आई.
---------------------------
"ती' माझ्यावर जीव ओवाळून टाकणारी, माझ्या कर्तृत्वावर विश्वास ठेऊन तिच्या आईला दुरावणारी, माझ्या यशावर जानसे फिदा होणारी, माझ्यातल्या मला सावरणारी, मी चूक असलो तरी बरोबर मानून सप्तपदीचा मान राखणारी पत्नी, प्रेयसी, माझी अर्धांगीनी आणि माझ्या पिलांची खास "आई' आणि अद्यापही मला पुरती न उमगलेली माझी सखी.
---------------------------
"ती' माझा अंश, माझी प्रतिमा, माझे प्रतिरूप, माझी स्वप्ने, छोट्याशा बाळमुठींतून माझ्या सुखांचे हळवे कोपरे समृद्ध करणारी, माझ्यावर बिनधास्त विश्वासून आयुष्याला बेधडक सामोरी जाणारी, सारं जग मुठीत घेऊन गगनाला गवसणी घालण्याची आकांक्षा बाळगणारी, येणाऱ्या प्रत्येक क्षणांना भिडण्याची पात्रता अंगी बाळगणारी माझी चिमुरडी.
---------------------
याशिवायही "ती' अनेक ज्ञात - अज्ञात रुपांतून अमीट, असामान्य कामगिरी करणारी, जेथे आम्ही श्वास घेतो ती "वसुंधरा'.
"ती'....बस्स! आता मात्र किती लिहू आणि काय लिहू असं झालंय म्हणून थांबतो.
----------------------
आता आलं लक्षात मी वरच्या मायन्यामध्ये काहीच का लिहू शकलो नाही. कारण माझ्यात "तिला' शब्दबद्ध करण्याचे बळच नाही. कारण "ती' अमर्याद, उत्तुंग, स्वच्छंद, गहिरी, अथांग, शब्दातीत आणि.... पाहिलंत असं होतं!
"तिला' लाख-लाख प्रणाम.
Subscribe to:
Post Comments (Atom)
8 comments:
प्राजक्त, तुझ्या मनाशी अत्यंत जवळिक साधून असलेल्या त्या सगळ्या ’ती ’ त्यांच्याबद्दलचे तुझ्या मनातले व्यक्त-अव्यक्त भाव वाचून, भरून पावल्यात. केवळ हे सारे तू इथे लिहीले म्हणून नाही तर तुझ्या त्यांच्याबरोबरच्या संवादातून ते त्यांना पोचत असतीलच.पण शेवटी कधी बोलून दाखवणेही जरूरी असतेच, हवेसेही असते.:)
जागतिक महिला दिनाच्या अनेक शुभेच्छा!
khupach sunder lihila ahes. Agadi ashach bahavana manat astat matra sangatana jad jate.
सुंदर झाली आहे पोस्ट!!!
महिला दिनाच्या शुभेच्छा!
Kolhapurkar, chabuk post zaliye...Naad-Khula!!
masttttt post
She has helped me to achive perfection in many forms.
sarwana khup khup dhanyawad....
It's touching to heart.....it's a very nice & mindblowing.
Post a Comment