Tuesday, August 10, 2010

म्हणूनच...

केबीनमधून खाडकन आवाज आल्याने बाहेरचे सगळे काम टाकून केबीनच्या दिशेने धावले. तेवढ्यात केबीनचे दार धाडकन ढकलून "तो' रुबाबदार तरूण बाहेर आला. त्याने बाहेर जमलेल्यांवर तुच्छतेने एक नजर टाकली आणि तो तडक तेथून बाहेर पडला. त्याला पाहत पाहत केबीनबाहेर जमलेही आपापल्या जागेवर जाऊन बसले.
--
"तो' घरी आला. कोपऱ्यात शुज काढत त्याने हातातली फाईल टेबलवर ठेवली. कानावर आई म्हणत असलेला श्‍लोक पडल्याने त्याला जरा बरे वाटले आणि मघाच्या प्रसंगाने तापलेलं डोकं काहीसं शांत झालं. त्यानं कपडे काढले आणि तो फ्रेश झाला. त्याच्या येण्याची चाहूल लागल्याने आईने त्याचा अंदाज घेतला आणि अटोपते घेत चहा टाकला.

कशी काय झाली मुलाखत?
ठीक. (आईच्या प्रश्‍नावर त्याने रुक्षपणे उत्तर दिलं)
आज पण काही....म्हणत आईनं त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि तिचं वाक्‍य अर्धवटच राहिलं...
आई! तुला माहित आहे...तरी तू मला तोच प्रश्‍न का विचारतेस?
राहिलं बाबा ! तुला जे योग्य वाटेल ते कर!
---
लक्ष्मीकांत येथेच राहतात का? बाहेरून कोणीतरी विचारले.
आईने बाहेर जाऊन पाहिले. दारात पोलिस.
हो..येथेच राहतो? काय झालं? काय काम आहे?
साहेबांनी त्यांना पोलिस ठाण्यात घेऊन यायला सांगितलंय!
आई कोण आहे गं?
अरे हे पोलिस तुला न्यायला आलेत बघ!
आई अगं घाबरू नकोस, मी पाहतो काय झालं ते!
तो बाहेर गेला, पुन्हा आत आला, "" आई तू जेवून घे, तो पर्यंत मी आलोच! चला!
"तो' पोलिसांबरोबर निघाला. त्याला आपण पोलिस ठाण्यात का निघालो आहोत याचा अंदाज आला; पण आईला त्याने काहीच सांगितले नाही. काही उपयोग होणार नव्हता त्याचा!
-----
या साहेब...बसा ! त्या कॉन्स्टेबलच्या कुत्सीत बोलण्याने त्याची विचारांची मालिका खंडित झाली. "तो' काहीसा दुखावला.
"मला येथे का बोलावलंय?'
आम्हाला वेळ जात नाही, वाईच गप्पा मारायच्या म्हणून ...(ही ही ही.)
त्याच्या हसण्याने खरंतर तो संतापला; पण त्याने संताप आवरला. कारणही तसंच होतं. त्याला पलीकडच्या मुख्य टेबलासमोर खुर्चीत बसलेला पाठमोरा माणूस दिसला.

"बसा! साहेब येऊ देत मग बघू तुमच्याकडे!'
"तो' काही बोलला नाही. शांत बसून राहिलां.
---
तेवढ्यात तेथील वरिष्ठ अधिकारी आले आणि खुर्चीत बसले! समोरच्या व्यक्तीबरोबर त्याचं काहीतरी बोलणं झालं.
तुकाराम..त्यांना घेऊन ये इकडं.
साहेबांनी बोलावलंय.
तो उठला आणि साहेबांपुढे जाऊन उभा राहिला?
""अरे लक्ष्मीकांत तू आणि इथं !''
"सर...मला घरातून बोलावून आणलं म्हणून आलो'
अरे तू आहेस... यांची तुझ्याबद्दल तक्रार आहे...तू म्हणे यांना मारहाण केलीस?
होय सर..मी यांच्या थोबाडीत दिली. त्याने थंडपणे सांगितले.
काय ऽऽऽ तुझ्याकडून अशा अपेक्षा नाहीत आणि तुला याचे परिणाम काय होतील याची कल्पना आहे नं! आणि तरीसुद्धा तू असं टोकांच पाऊल का उचललंस?
"सर तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे; पण आधी त्यांना कारण तरी विचारा'
"काय झालं म्हणून याने तुम्हाला थोबाडीत मारली' त्यांनी त्या व्यक्तीला विचारलं.
...मी यांची मुलाखत घेत होतो? काही प्रश्‍न विचारले बस्स! आणि याने मला थेट मारहाण केली.'
"सर एक मिनिट मी यांना मारहाण केलेली नाही. फक्त एक थोबाडीत लगावली आहे आणि ते ही मला नको तो प्रश्‍न विचारला म्हणून!'
असा काय प्रश्‍न विचारला म्हणून तू त्यांना मारलेस?
"सर विचारा त्यांनाच, त्यांच्या सडक्‍या मेंदूत काय शिजत होतं त्यांनाच माहित!'
"सर काय विचारलंत तुम्ही'
.............(काही वेळ शांततेत गेला)
सर ते काय बोलणार? साऱ्या जगाला ते तत्वज्ञान सांगतात आणि स्वतः वागताना मात्र खालची पातळी गाठतात.' माझी सर्व सट्रीफिकीट यांनी पाहिली. माझे मार्क्‍स पाहिले. ते पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की यांचा "कॅंडीडेट' माझ्यापुढे टिकाव धरू शकणार नाही. मग यांनी माझ्या सर्टीफिकीटवर वाचून पुन्हा-पुन्हा माझी "जात' विचारली. मी एकदा सांगितले तर मला ऐकू कमी येतं जरा मोठ्यानं सांगा म्हणत पुन्हा पुन्हा विचारलं ! मग मी मोठ्यानं सांगितलं. त्यानंतर त्यांनी माझ्यावर जातीवाचक शेरेबाजी केली. मग माझं डोकं फिरलं आणि दिली ठेऊन कानाखाली आता ते नक्कीच पुन्हा कधीच कोणाची "जात' विचारणार नाहीत. विचारा त्यांना.
-----
काय हे खरंय हे?
ती व्यक्ती काहीच बोलली नाही.

लक्ष्मीकांत जा तू... पुन्हा असे करू नकोस. रागावर कंट्रोल कर.
(थॅंक्‍यू सर म्हणून तो बाहेर पडला)
सर तुम्ही असं का केलंत? तुम्ही उच्चविद्याविभूषीत...तुम्ही या पदापर्यंत पोचलात ते कष्टाने, तुमच्या कर्माने. कधी तुमची "हलकी' जात तुमच्या आडवी आली नाही. तुम्हाला सुविधा मिळाल्या, तुम्हाला फायदा झाला म्हणून कोणीही तुमच्या विरोधात बोलल्याचं ऐकिवातही नाही. आम्ही सर्वच तुमचा आदर करतो. तुम्हीही "त्याच' चुका करू लागलात तर कशी सांधणार दुरावलेली मनं?
या तुम्ही. मला वाटतंय आता तुमची काही तक्रार उरली नसले. त्यांच्या उत्तराची अपेक्षा न करता त्यांनी दुसरी फाईल उघडली.

4 comments:

शिरीष said...

खरं तर असे कोणी चिडवले की दुर्लक्षित करणे शक्य नसेल तर चिडवणाऱ्याला उलट चिडवणे हे पारमार्थिक आहे... असे आम्हांस वाटते... वचने किं दरिद्रता...
उ.दा.
त्याने विचारलेला "जात" हा शब्द ऐकू न आल्यासारखे करून मी "जाट" नाही एवढेच उत्तर द्यायचे आणि काय होते ते शांतपणे बघायचे :-)

म्हणजे आपण खोटे बोलत नाही एवढेच कळते...

Vijay Deshmukh said...

vvaa !! vegali baaju mandali ...

भानस said...

अधिकारपद आणि लाच हे दोन्ही माणसांना नको इतके उद्दाम बनवतात मग त्यांना वाटते आपण सर्वेसर्वा... मग एखाद्याने चिडून श्रीमुखात भडकवली तरी हेच तक्रार करणार.

प्रसाद, कथा आवडली. मार्मिक.
( कशी कोण जाणे नजरचुकीने असेल ही कथा वाचायची राहून गेली. :( )

Shardul said...

Chan lihila aahe :)