परवा दुपारी एक ढग
माझ्या खिडकीवर आला
त्याला पाहून चिमुकलीचा
चेहरा आनंदाने खुलला
बोबडे बोल ऐकताना
तो काहीसा रेंगाळला
वहायचं विसरून लगेच
तिच्या भेटीला धावला
एवढ्यात मागचा ढग
म्हणाला "थांबलास काय
चल, पुढचा मुक्काम
गाठायचाय लवकर'
तो हसला म्हणाला,
"सॉरी मित्रा, तू हो पुढं
माझं ठिकाण मी
मघाशीच गाठलंय!
"ती बघ ती चिमुरडी
पाहून मला आनंदलीय
माझ्या भेटीसाठी
किती आतूर झालीय!
मागचा ढग म्हणाला
"ठिक आहे, तू थांब,
पण आपल्यासाठी तिकडे
बळीराजा झुरतोय विदर्भात'
पहिला ढग ओशाळला.
"चिमुरडीकडे पाहून म्हणाला
"गडे टाटा माझा तुला
मी निघतो माझ्या मुक्कामाला'
रागावू नकोस तू माझ्यावर
गालांवर थिजले थेंब घेऊन
एक चिमुरडी बसलीय तिथे
डोळे लावून माझ्या वाटेवर
6 comments:
प्रा...सहीच...मस्त जमली आहे!!!
लय भारी!!!
मस्त!!!
thank u manmauji and sonal
व्वा व्वा ! खूपच छान - साधी, सोपी पण सुंदर, आशयपूर्ण रचना. मुखपृष्ठावरील "विटेवरील सुंदर ध्यान" पाहून तर डोळे निवतातच.
thank u shashank
एकदम मस्त !!
Post a Comment