Sunday, November 22, 2009

परुळेकरांचा राग नेमका कुणावर

"लोकप्रभा'मधील "अल्केमिस्ट्री' सदरात परुळेकर यांनी सचिन तेंडुलकरबद्दल लिहिलेला लेख वाचला आणि त्या लेखामध्ये त्यांनी उधळलेली मुक्ताफळे वाचताना परुळेकरांच्या विचारांबद्दल किव आली. सचिन तेंडुलकरला टार्गेट करून लिहिलेला हा लेख परुळेकर यांच्यासारखा "विचारी' माणूस बुद्धी (शंका आहेच) गहाण ठेऊन कसा काय लिहू शकतो याचे आश्‍चर्य वाटले.
मुळात या लेखाचे प्रयोजन अखेरपर्यंत समजत नाही. या लेखात ते सचिन तेंडुलकरला भंपक-ढोंगी म्हणतात, शरद पवार यांच्यावर टिप्पणी करतात, सचिनला ग्लॅडीएटर संबोधून पुन्हा तो कसा भंपक आहे हेच सांगतात. मला त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही असे एकिकडे लिहितात आणि दुसरीकडे संपूर्ण लेखात मिळेल तेथे सचिनला ओरखडत राहतात हे कशाचे लक्षण.
सचिन खेळतो व चाहते त्याचा आनंद घेतात. तो खेळत नाही तेव्हा हेच चाहते त्याच्यावर टीकेची झोड उठवितात हा साधा सरळ मामला आहे. म्हणूनच मग त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 20 वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्याचे कौतुकही अगदी दिलदारपणे करतात. त्याबाबत प्रसारमाध्यमांना मठ्ठ म्हणण्याचा अधिकार परुळेकर यांना कोणी दिला? या लेखानुसार इतर सर्व मुर्ख आणि परुळेकरच तेव्हढे शहाणे असे वाटून राहते हे खरे कसे समजायचे? अनेक बाबींची गल्लत करताना अत्यंत गोंधळलेल्या मानसिकतेमध्ये परुळेकर यांनी हा लेख लिहिला असावा असे वाटते पण असे का?
सचिन एक खेळाडू आहे. तो सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर वावरत असतो. मुंबई कोणाची? या प्रश्‍नावर त्याने दिलेले उत्तर अगदी सहज होते; मात्र इलेक्‍ट्रॉनिक प्रसारमाध्यमांनीच सलग दोन दिवस सचिनचे तेच ते वाक्‍य पुनःपुन्हा दाखवून अनावश्‍यक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी परुळेकर काहीच कसे बोलले नाहीत. हा चावटपणा त्यांना दिसला नाही की तो त्यांनी पाहून न पाहिल्यासारखा केला. बरं स्वतः फारसे क्रिकेट न पाहणाऱ्या परुळेकरांनी सचिनबद्दलची फुटपट्टी कशाच्या आधारावर लावली?
प्रकाश-मंदा आमटे, अभय-राणी बंग आदी दिग्गजांबद्दल परुळेकर लिहितात. ते महान आहेतच. त्यांनी कधीही ते महान आहेत याचा ढोल वाजविलेला नाही. ते ही कधी प्रसारमाध्यमांकडे प्रसिद्धी द्या, असे सांगायला गेले नाहीत हे सत्यच आहे कारण त्याची त्यांना गरज वाटत नाही. त्या प्रमाणेच सचिनही कधी प्रसारमाध्यमांकडे आपणहून गेल्याचे ऐकिवात नाही. (अपनालयसारख्या संस्थांना तो मदतीचा हात देतो, हे कित्येक वर्षांनी उघड झाले. जर त्याला सामाजिक भान नसते तर तो अशा बाबी करूच शकला नसता) आत्ताही "माझी आंतरराष्ट्रीय क्रिकेटची 20 वर्षे झाली आहेत, तुम्ही माझ्यावर पुरवण्या काढा, लेख लिहा, चॅनेल दिवसभर ढणढणत ठेवा असे सांगण्यास तो गेलेला नव्हता. कोट्यवधींसाठी विरंगुळ्याचे ठिकाण असलेल्यांना सचिनबद्दल जे वाटते तेच देण्याचा प्रयत्न प्रसारमाध्यमांनी केला आहे व त्यातून व्यवसायही केला आहे. (आत्ता हेच पहा! तुम्ही ही टीकाटीप्पणी का केली? तर हा लेख वाचावा आणि यावर चर्चा सुरू व्हावी हाच तुमचा उद्देश असावा. म्हणजेच हा विषय तुम्हालाही सेलेबल वाटलाच ना? बहुधा हेच प्रयोजन हा लेख लिहिण्याचे असावे.)
मराठी माणसाला मराठी माणसाचे बरे वाटत नाही, असे मात्र हा लेख वाचल्यानंतर वाटून राहते. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटची वीस वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्याच्यावर उधळण्यात येत असलेली स्तुतीसुमने परुळेकरांना रुचलेली दिसत नसावीत आणि त्यातूनच हा लेख लिहिला की काय असा प्रश्‍न पडतो.
या लेखामध्ये सचिन श्रीमंत असल्यामुळे त्याला मान देतात असा एक उल्लेख केला आहे. तो उल्लेख वाचल्यानंतर परुळेकरांचा सचिनबद्दलचा आकसच दिसतो. वीस वर्षांपूर्वी जेव्हा सचिन मैदानात उतरला तेव्हा तो सर्वसामान्यच होता. आणि तरी त्यावेळीही जगभरातील क्रिकेट खेळणाऱ्या देशांचा तोच लाडका होता. आपल्या बॅटची मर्दमुकी गाजवून जेव्हा त्याने भारतीय संघाच्या यशात वाटा उचलला तेव्हा लक्ष्मी त्याच्यावर प्रसन्न झाली आणि मग ती त्याच्यावर फिदा झाली; मात्र त्यासाठी त्याला कुणापुढे हात पसरावे लागले नाहीत. तो खेळत राहिला आणि यश त्याला मिळत गेले. कोट्यवधींची स्वप्ने तो मैदानात प्रत्यक्षात उतरवू लागला म्हणूनच वैभवाचा मानकरी तो ठरला.
"मी भारतीय आहे; पण महाराष्ट्रीयन असल्याचा मला अभिमान आहे,' या सचिनच्या वाक्‍याचा अर्थ बहुधा परुळेकर यांना समजलेला नसावा (किंवा त्यांना तो समजून न घेता "सचिन मुंबई भारताची म्हणाला' यावरच बोट ठेवायचे आहे काय? शिवसेना स्टाईल; पण तसा अधिकार शिवसेनाप्रमुखांना आहे. तुम्ही तर पत्रकार) किंवा प्रत्येक वेळा सचिनने "मी मराठी'चा ढोल वाजविलाच पाहिजे' अशी अपेक्षा ठेऊन ती पूर्ण न झाल्याच्या आकसातून हा लेख लिहिला आहे, असे मात्र वाटून राहते. त्यामुळे परुळेकर यांच्या सारख्या साक्षेपी, बहुआयामी, विचारवंत पत्रकाराचा नेमका राग कोणावर आहे? हा प्रश्‍न, प्रश्‍नच राहतो.

10 comments:

Anonymous said...

dear prasad, mr. parulekar supposed to be shivsena's man. if shivsena take stand to oppose sachin, how could mr.parulekar write against shivsena's stand?

Pravin said...

Totally agree with you. I too have sent an email to him and posted it on my blog too. So far I havent received any response from him.

हेरंब said...

हो ना.. निव्वळ आकस आणि सवंग लोकप्रियता मिळवणे हे २ च हेतू दिसले मला तरी. मी त्यांना आणि लोकप्रभाला लगेच इ-पत्र पाठवलं आणि तेच माझ्या blog वर पण टाकल. पण प्रवीण प्रमाणेच मलाही अजूनही काही response आलेला नाही त्यांच्याकडून

देवदत्त said...

तुमच्या विचारांशी सहमत. परूळेकरांनी काय लिहायचे तेच बहुधा ठरवले नव्हते. :)

sameera said...

Maze kahi doubts ahet :
1) Raju parulekar yani asa kay motha kaam kela ahe, ki jya mule "marathi" manasala tyancha abhiman watava? Tyancha swatacha contribution kay ahe? Manda/Prakash Amate, Abhay/Rani bang yanchya karyabaddal sarvana tyancha adarach ahe.. Parantu, lekhamadhye tyanchi nave waparun lekhala wajan ananya wyatirikt Raju Parulekarani swatah ase kay karya kele ahe?
Atleast tyani tyanchya(swatachya nahi bara ka!! Manda/prakash amate, rani/abhay bang yanchya!) karyachi mahiti denara lekha tari lihila ahe kay? (Maze adnyan ahe, please asel, tar mala wachayala awadel!!) Ki Raju Parulekar yana watate ki patrakar asalyamule, tyani itarana kay karave yache fakt salle dyavet.. Ani apan korade pashan rahave?
2) Sachin la gladiator mhanatana, te swata: la nakki kuthe baghatat? Atleast whatever sachin is doing, he is best at it... Raju parulekar swatah swatah baddal ase mhanu shakatat ka (itaranche tar sodach ho!!!) Patrakarita mhatale, ki kimanpakshi tari ti pakshapati nasavi.. Parulekarani swatah sathi jo wyawasay niwadala ahe, tyachi principles tari te swatah neat follow kartat ka? Ki tyana apan rajachya darabari je vidushak hote (je Raja la pahije tevha, tyala pahije tashi tyachi karamanuk karayache, khushamat karayache) tase mhanu shakato? Sachin rajdarbari gladiator ani Raju parulekar widushak!!!
3) Udya Raju parulekar mhanatil, Lata mangeshkar yanche samajat kay contribution ahe, tya tar fakt gatat!!! Tyanchya mumbai/marathi baddal chya matala kahi kimmat deu naye!!!!
Pan mag kay Parulekaranchya matala kimmat dyavi, je fakt sawang lokpriyate sathi (ya lekhat tari tech disatay...) "Lihitat"?
4) Jya channels/newspapers ne sachin chi 20 years celebrate keli, tyanchya kade sachin gela navhata, mazya war suppliment kadha mhanun, kinva lokanchya problems kade durlaksha kara mhanun!!! Sachin ya sagalyachya palikade ahe..
5) Sachin chya property che bolal, tar Madhu koda, Lalu prasad yadav, yanchi property pan bagha ki jara.. Tumachya lekhani madhye evadha dam ahe na, kahi tari karayachi aas ahe na, mag uthava ki awaz tyanchya wiruddha... Kinva, uthava ki awaz sattadharyanwiruddha, jyani sachin la "gladiator" banawun lokanche problems najareaad kelet... Itar channels na akkal nahi ahe, tumhala ahe na, wapara ki.. Ani janateche problems manda.. Swatachi akkal sachin war korde maranyat waparatay te ka? Ki, sachin kahi bolnar nahi, mhanun daga tof tyachya war.. Mhanaje apali image pan banel, ekach patrakar jyala janatechya problems chi kadar ahe mhanun, ase kahise watale parulekarana!!!

सिद्धार्थ said...

मलाही काहीच कळलं नाही लेख वाचून. मागे परुळेकरांचाच "उद्धव (मर्द) ठाकरे" हा लेख वाचला होता. तो बराच मुद्देसुद आणि विचारपूर्वक लिहाला होता. आणि त्या लेखावरून राजू परुळेकर "सेना" समर्थक आहेत असे वाटत नाही. आणि जरी ते सेना समर्थक असले तरी सचिनला बोलण्याचा त्यांना काही अधिकार नाही. हा लेख वाचून त्यांना स्वत:ला देखील आपण काय आणि कशाबद्दल लिहतोय हे समजलेले दिसत नाही. मला तो लेख वाचून परुळेकरांची दया आली.

prajkta said...

sarvana manapasun dhanyawad

Anonymous said...

राजू परुळेकर हे मनसेचे पेड पीआरओ आहेत. शिवसेनेविरुद्ध ओकलेल्या प्रत्येक गरळीचा त्यांना मोबदला मिळत असावा, असे त्यांच्या निष्ठेवरून वाटते. शेवटी फ्रीलन्सिंग करून काय मिळणार?

भानस said...

प्राजक्त मी तुला टॆगलेय रे....पाहशील?

Anonymous said...

waah....ha blog vachun anand zala. sam-vichari manase bhetalyacha. Kaalch Parulekarancha 'to' lekh vachanat ala (ho jara ushirach ala.....pan vachanat alach nasata tar bare zale asate ase vatale :))
lagech ch tyana ek e-mail kelay....reply yenyachi apeksha nahich taripan. To lekh mhanaje fakt prasiddhi milavanyacha ani shiv-senela support karanyacha ek prayatn hota ase vatate.