Saturday, November 26, 2011

ज्योत से ज्योत...त्रिपुरारी पौर्णिमेला पहाटे कोल्हापुरातील पंचगंगा घाटावर सुमारे 51 हजारांवर पणत्या उजळल्या आणि त्याच्या मिणमिणत्या ज्योतीने सारा भवताल प्रकाशमान झाला. धुक्‍यांची शेला सोबतीला घेऊन येणाऱ्या मस्त थंडीची चाहूल, पंचगंगेच्या प्रवाहावरून हळूवार पुढे सरकणारे धुके. वाऱ्याच्या झुळकीसोबत लवलवणाऱ्या ज्योतींची आगळीवेगळी मैफल येथे सजली. या मैफलीमध्ये यथाशक्ती प्रत्येकाने ज्योतीतून ज्योत तेजवून प्रकाश भरला. उपस्थित कोल्हापूरकरांनी ही मैफल अगदी मनापासून अनुभवली आणि पंचगंगा फ्रेंडस सर्कल ग्रुपच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमाला धन्यवाद देत पावले आपसूक घराच्या दिशेने वळली.

3 comments:

Shardul said...

दोन्ही फोटो आवडले !
दुसरा झकास..
पहिला लाजवाब !

Sonal said...

ekdam bhaari! Photos tumhich kadhle ka? khup chhan aahet. Thodkyatla write up pan khup kaahi sangun gela...

भानस said...

ओह्ह! काय सुंदर दृष्य असेल रे ! कधीतरी समक्ष ही मैफल पाहण्याचा योग यावाच.. :)