सिग्नल लागला आणि त्यानं गाडी उभी केली. उन्हाच्या तडाख्याने तो जाम वैतागला होता. हातातलं काम उरकून केव्हा एकदा ऑफिसच्या एसीमध्ये शिरतोय असं त्याला झालेलं; पण अजून दोन तास तरी त्याला उन्हात फिरावेच लागणार होते. तो दीड मिनिटे संपण्याची वाट पाहू लागला. टळटळीत उन्हातला प्रत्येक सेकंद त्याला शिक्षा वाटत होती.
"सालं काय आपलं नशिब! दिवसभर वणवण फिरा, क्लायंटना कन्व्हीन्स करा. जास्तीत जास्त बिझनेस होण्यासाठी प्रयत्न करा. बॉसपुढं रेकॉर्ड चोख राहील म्हणून धडपडा. करीयर ग्राफ वाढता रहावा, जास्त पैसा मिळावा म्हणून धडपडा. घरतल्यांच्या आनंदासाठी उन्हा-तान्हात हिंडा. चेहरा काळवंडून जातो. संध्याकाळी जीव नकोसा होतो. तरी बरं पैसे बरे सुटतात, नाहीतर...'
खण-खण आवाजाने त्याची विचारांची तंद्री भंगली. त्यानं आवाजाच्या दिशेने नजर टाकली.
फाटके कपडे घातलेली दोन पोरं जीव खाऊन खाली पडलेल्या सिमेंटच्या पिलरवर हातोड्याने घाव घालत होती.
"काय पोरं आहेत! उन्हा-तान्हात कशाला खेळत असतील? असा प्रश्न त्याच्या डोक्यात वळवळला.
तेवढ्यात पाठीमागून कर्कश्श हॉर्न वाजला आणि त्याची विचारांची तंद्री भंगली. सिग्नल सुटला होता. त्यानं किक मारली आणि वाहनांच्या गर्दीतून वाहून जाऊ लागला.
----
तासाभराचे काम आटोपून तो पुन्हा मघाच्याच चौकात आला आणि पुन्हा सिग्नल लागला. आता तो स्वतःवरच वैतागला. दीड मिनिटे पुन्हा रणरणत्या उन्हाची शिक्षा. पुन्हा घाम, चिक-चिक. वैताग साला! एवढ्यात त्याच्या कानावर पुन्हा खण-खण आवाज आला. त्याचे लक्ष तिकडं गेलं. मघाची तीच पोरं जीव खाऊन त्याच पिलरवर हातोड्याने घाव घालत होती.
आता त्याचे कुतुहल जागे झाले. त्याने गाडी वळविली आणि तो त्या पोरांच्या बाजूला जाऊन उभा राहिला.
"काय करताय रे पोरानो?'
त्याच्या प्रश्नाने ती पोरं दचकली. त्यांचे हातोडे थांबले. चेहऱ्यावर अनामिक भीती तरळली.
"काही नाही...काही नाही! आम्ही आपलं हे...' असं म्हणून ती पोरं अडखळली.
"अरे घाबरू नका, उन्हा-तान्हात काय खेळताय हे बघायला मी आलोय बाकी काही नाही'
"हात तुझं! असं म्हणून त्यातल्या एकानं पुन्हा हातोडा सरसावला आणि खाणकन पिलरवर घाव घातला.'
दुसरा त्याच्या तोंडाकडं बघत म्हणाला, ""साहेब खेळत नाय काय, या पिलरमधनं लोखंडाचं तुकडं काडतुय.''
"लोखंडाचे तुकडे? आणि त्याचं काय करता?'
"ओ साहेब जाऊ द्या नां! ए वश्या आटप लवकर. उगच नको बोलत बसू. त्यांना न्हाई काम. तू मार फटके.'
दुसरा म्हणाला,"" साहेब जावा तुम्ही ह्यो शिवज्या न्हाई शाना, उगीच काय तरी बोलंल तुम्हाला जावा तुम्ही.'
""अरे पण तुम्ही उन्हा-तान्हात या पिलरमधून लोखंडाचे तुकडे का काढत बसलाय? आणि तुम्हाला शाळा नाही?''
""शाळा आणि आमी, काय साहेब चेष्टा करताय काय गरिबाची? आवं हिथ दोन येळचं जेवण मिळावं म्हनून आख्खा दिस उन्हा-तान्हात घालवावा लागतूय. आसं पडक्या ठिकाणचं सिमेंटची दगडं, पिलर हुडकायची, दिवसभर हाताला फोड येईस्तवर फोडून त्यातनं लोखंड काढायचं. राती भंगारचं दुकान बंद व्हायच्या आत तिथं जायाचं. फोडून काढलेलं लोखंडाचं तुकडं तिथं द्यायचं. त्याचं वजन करायचं. पाच-पंचवीस रुपये मिळतात. ते घ्यायचं आनी घर गाठायचं. साला तो भंगारवाला त्यात पण काटा मारतोय, पण करणार काय? गुमान दिल ते पैसे घ्यायचं. पैसं आसलं, तर आई घरात घेती, नायतर बोंब मारती. शिव्या घालती''
""का?'' आता त्याची छाती भरून आली. दाटलेल्या आवाजात न राहवून त्यानं मध्येच प्रश्न विचारला.
""सावत्र हाय न्हवं! बाचा पत्त्या नाय; पण घरात ठिऊन घेतीया हेच लय झालं. ती पण काय करणार म्हणा. ती चार घरची धुणी भांडी करती. आणखी दोन भनी हायेत. पाच जणांच्या पोटाची खळगी तिला भरायची हाईत. दोनी पोरींना उजवायचं हाय. मग आमी नाय पैसै मिळवायचं तर कुनी, तुमीच सांगा सायेब?''
त्याचं लक्ष दोघांच्या हाताकडं गेलं. हात पार सोलवटून निघालेले; पण डोळ्यात जगण्याची चमक आणि दोन पैसै मिळवायची धमक स्पष्ट.
""आपल्याला जरा ऊन लागलं तर मघाशी आपण स्वतःवरच चरफडलो आणि ही पोरं...
त्याचे डोळे भरले. त्यानं पाकिट काढलं हाताला लागतील तेवढे पैसै घेतले आणि त्या पोराच्या सोलवटलेल्या हातावर ठेवले. दोघांच्याही डोक्यावरून हात फिरवला आणि काहीही न बोलता गाडीला कीक मारली.''
""पोरांचे डोळे चमकले. ऊन थंड वाटू लागलं, हातात आणखी बळं आलं. त्यांनी आणखी जोमाने हातोड्याचे घाव घालायला सुरवात केली. आज पोटभर अन्न मिळणार याची त्यांना मनोमन खात्री पटली होती.''
Saturday, October 30, 2010
Monday, October 4, 2010
आठवणींचा दरवळ

कोणी येतं आयुष्यात
एक झुळुक बनून!
रेंगाळून राहतं सभोवती
आश्वासक होऊन!
स्वप्ने वेडी खुळावती
गुंफल्या मनांतून!
झंकारून उठताती मग
सूरही ह्रदयातून!
ताऱ्यांचा चमकता गावही
मावतो ओंजळीतून!
आणाभाकांचा पर्वत राहतो
उभा शब्दांतून!
---
हाय... दुर्दैव आणते
अघटीत घडवून!
कोसळती स्वप्ने, इमले
पडते सारे मोडून!
फुलणारे नाते कोमेजते
आठवणींचा दरवळ
मागे ठेऊन!
Tuesday, August 10, 2010
म्हणूनच...
केबीनमधून खाडकन आवाज आल्याने बाहेरचे सगळे काम टाकून केबीनच्या दिशेने धावले. तेवढ्यात केबीनचे दार धाडकन ढकलून "तो' रुबाबदार तरूण बाहेर आला. त्याने बाहेर जमलेल्यांवर तुच्छतेने एक नजर टाकली आणि तो तडक तेथून बाहेर पडला. त्याला पाहत पाहत केबीनबाहेर जमलेही आपापल्या जागेवर जाऊन बसले.
--
"तो' घरी आला. कोपऱ्यात शुज काढत त्याने हातातली फाईल टेबलवर ठेवली. कानावर आई म्हणत असलेला श्लोक पडल्याने त्याला जरा बरे वाटले आणि मघाच्या प्रसंगाने तापलेलं डोकं काहीसं शांत झालं. त्यानं कपडे काढले आणि तो फ्रेश झाला. त्याच्या येण्याची चाहूल लागल्याने आईने त्याचा अंदाज घेतला आणि अटोपते घेत चहा टाकला.
कशी काय झाली मुलाखत?
ठीक. (आईच्या प्रश्नावर त्याने रुक्षपणे उत्तर दिलं)
आज पण काही....म्हणत आईनं त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि तिचं वाक्य अर्धवटच राहिलं...
आई! तुला माहित आहे...तरी तू मला तोच प्रश्न का विचारतेस?
राहिलं बाबा ! तुला जे योग्य वाटेल ते कर!
---
लक्ष्मीकांत येथेच राहतात का? बाहेरून कोणीतरी विचारले.
आईने बाहेर जाऊन पाहिले. दारात पोलिस.
हो..येथेच राहतो? काय झालं? काय काम आहे?
साहेबांनी त्यांना पोलिस ठाण्यात घेऊन यायला सांगितलंय!
आई कोण आहे गं?
अरे हे पोलिस तुला न्यायला आलेत बघ!
आई अगं घाबरू नकोस, मी पाहतो काय झालं ते!
तो बाहेर गेला, पुन्हा आत आला, "" आई तू जेवून घे, तो पर्यंत मी आलोच! चला!
"तो' पोलिसांबरोबर निघाला. त्याला आपण पोलिस ठाण्यात का निघालो आहोत याचा अंदाज आला; पण आईला त्याने काहीच सांगितले नाही. काही उपयोग होणार नव्हता त्याचा!
-----
या साहेब...बसा ! त्या कॉन्स्टेबलच्या कुत्सीत बोलण्याने त्याची विचारांची मालिका खंडित झाली. "तो' काहीसा दुखावला.
"मला येथे का बोलावलंय?'
आम्हाला वेळ जात नाही, वाईच गप्पा मारायच्या म्हणून ...(ही ही ही.)
त्याच्या हसण्याने खरंतर तो संतापला; पण त्याने संताप आवरला. कारणही तसंच होतं. त्याला पलीकडच्या मुख्य टेबलासमोर खुर्चीत बसलेला पाठमोरा माणूस दिसला.
"बसा! साहेब येऊ देत मग बघू तुमच्याकडे!'
"तो' काही बोलला नाही. शांत बसून राहिलां.
---
तेवढ्यात तेथील वरिष्ठ अधिकारी आले आणि खुर्चीत बसले! समोरच्या व्यक्तीबरोबर त्याचं काहीतरी बोलणं झालं.
तुकाराम..त्यांना घेऊन ये इकडं.
साहेबांनी बोलावलंय.
तो उठला आणि साहेबांपुढे जाऊन उभा राहिला?
""अरे लक्ष्मीकांत तू आणि इथं !''
"सर...मला घरातून बोलावून आणलं म्हणून आलो'
अरे तू आहेस... यांची तुझ्याबद्दल तक्रार आहे...तू म्हणे यांना मारहाण केलीस?
होय सर..मी यांच्या थोबाडीत दिली. त्याने थंडपणे सांगितले.
काय ऽऽऽ तुझ्याकडून अशा अपेक्षा नाहीत आणि तुला याचे परिणाम काय होतील याची कल्पना आहे नं! आणि तरीसुद्धा तू असं टोकांच पाऊल का उचललंस?
"सर तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे; पण आधी त्यांना कारण तरी विचारा'
"काय झालं म्हणून याने तुम्हाला थोबाडीत मारली' त्यांनी त्या व्यक्तीला विचारलं.
...मी यांची मुलाखत घेत होतो? काही प्रश्न विचारले बस्स! आणि याने मला थेट मारहाण केली.'
"सर एक मिनिट मी यांना मारहाण केलेली नाही. फक्त एक थोबाडीत लगावली आहे आणि ते ही मला नको तो प्रश्न विचारला म्हणून!'
असा काय प्रश्न विचारला म्हणून तू त्यांना मारलेस?
"सर विचारा त्यांनाच, त्यांच्या सडक्या मेंदूत काय शिजत होतं त्यांनाच माहित!'
"सर काय विचारलंत तुम्ही'
.............(काही वेळ शांततेत गेला)
सर ते काय बोलणार? साऱ्या जगाला ते तत्वज्ञान सांगतात आणि स्वतः वागताना मात्र खालची पातळी गाठतात.' माझी सर्व सट्रीफिकीट यांनी पाहिली. माझे मार्क्स पाहिले. ते पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की यांचा "कॅंडीडेट' माझ्यापुढे टिकाव धरू शकणार नाही. मग यांनी माझ्या सर्टीफिकीटवर वाचून पुन्हा-पुन्हा माझी "जात' विचारली. मी एकदा सांगितले तर मला ऐकू कमी येतं जरा मोठ्यानं सांगा म्हणत पुन्हा पुन्हा विचारलं ! मग मी मोठ्यानं सांगितलं. त्यानंतर त्यांनी माझ्यावर जातीवाचक शेरेबाजी केली. मग माझं डोकं फिरलं आणि दिली ठेऊन कानाखाली आता ते नक्कीच पुन्हा कधीच कोणाची "जात' विचारणार नाहीत. विचारा त्यांना.
-----
काय हे खरंय हे?
ती व्यक्ती काहीच बोलली नाही.
लक्ष्मीकांत जा तू... पुन्हा असे करू नकोस. रागावर कंट्रोल कर.
(थॅंक्यू सर म्हणून तो बाहेर पडला)
सर तुम्ही असं का केलंत? तुम्ही उच्चविद्याविभूषीत...तुम्ही या पदापर्यंत पोचलात ते कष्टाने, तुमच्या कर्माने. कधी तुमची "हलकी' जात तुमच्या आडवी आली नाही. तुम्हाला सुविधा मिळाल्या, तुम्हाला फायदा झाला म्हणून कोणीही तुमच्या विरोधात बोलल्याचं ऐकिवातही नाही. आम्ही सर्वच तुमचा आदर करतो. तुम्हीही "त्याच' चुका करू लागलात तर कशी सांधणार दुरावलेली मनं?
या तुम्ही. मला वाटतंय आता तुमची काही तक्रार उरली नसले. त्यांच्या उत्तराची अपेक्षा न करता त्यांनी दुसरी फाईल उघडली.

Monday, August 2, 2010
मनातला विठ्ठल!
पहाटे आजी नेहमीप्रमाणे मंदिरात गेल्या, पूजा झाली, काकड आरती झाली. मनोभावे त्यांनी विठ्ठलमूर्तीला नमस्कार केला; मात्र आज पुन्हा त्यांना विठ्ठलाच्या चेहऱ्यावर नेहमीचे तेज दिसलेच नाही. त्या पुन्हा अस्वस्थ झाल्या. गेल्या काही दिवसांत त्यांना विठ्ठलाच्या चेहऱ्यावर तेजच दिसत नव्हतं आणि असं का व्हावं हा विचार त्यांचा पिच्छा सोडत नव्हता. या विचारांच्या तंद्रीतच त्या मंदिरातून बाहेर पडल्या. रेंगाळतच पायऱ्या उतरून चालू लागल्या. पावसाची रिपरिप सुरू झाल्याने चालण्याचा वेग त्यांनी जमेल तसा वाढविला. दोन-चार मिनिटे चालल्यानंतर त्या राहत असलेल्या इमारतीजवळ आल्या. पायऱ्या चढून घरात गेल्या. काहीसा दम लागल्याने दाराजवळच खुर्चीत बसल्या. वेग घेतलेला श्वास लयीत येत असताना पुन्हा विठ्ठलमूर्ती आठवू लागल्या.
...पहाट असूनही आज एकादशीमुळे मंदिरात गर्दी होतीच; भक्तांची ये जा सुरू होती; बाहेर भिकारीही नेहमीपेक्षा जास्त दिसत होते. एखादा दुसरा भक्त त्यांच्या हातात चिल्लर भिरकावून निघून जात होता एवढंच. आज आपण पूजेला नेहमीपेक्षा जास्त वेळ दिला. प्रार्थना, अभंगही व्यवस्थीत म्हटले. निदान आज तरी गेले काही दिवस मनात सुरू असलेली अस्वस्थता कमी होईल असं वाटलं होतं, पण छे! असं का व्हावं? याचा विचार करताना त्यांच्या सुरकुतल्या चेहऱ्यावरील चिंतेचं जाळं आणखी दाट होत गेलं. मग मनाशी काय वाटलं! आणि त्या खुर्चीतून उठल्या. स्वयंपाकघरात गेल्या. पातेलं ठेवून त्यात आदण ठेवलं, चहा-साखर घातली, गॅस बारीक केला आणि पिशवी घेऊन होता होईल तेवढ्या वेगाने जिना उतरून खाली आल्या. जवळच्या डेअरीमध्ये जाऊन दुधाच्या पिशव्या घेतल्या आणि पुन्हा घर गाठले. एव्हाना चहा चांगलाच उकळला होता. आणलेलं दूध त्यांनी त्यामध्ये ओतलं. पुन्हा एकदा चहा चांगला उकळून घेतला. हातावर थेंब टाकून चव पाहिली. "ठिक जमलाय' असं दर्शवणारी मान आपसूक हलली. चहा किटलीत ओतला आणि किटली पिशवीत ठेवून त्या पायऱ्या उतरल्या आणि झपझप पुन्हा मंदिर गाठलं!
आता पाऊस थांबला होता; पण गारठा जाणवत होताच. मंदिरातली लगबग सुरूच होती. त्या भिकाऱ्यांजवळ गेल्या आणि एकेकाला चहा देऊ लागल्या. वीस-पंचवीस भिकाऱ्यांना त्यांनी गरम-गरम चहा दिला. चहा वाटून झाल्यानंतर भिकाऱ्यांचे चेहरे पाहून त्यांच्या मनातला मघाचा विचारांचा कल्लोळ काहीसा कमी झाला. चेहऱ्यावरील चिंतेचं जाळं काहीसं सैलावलं. घरी जाण्यापूर्वी पुन्हा मंदिरात गेल्या. विठ्ठलाला हात जोडले आणि जायला निघाल्या. आता त्यांना विठ्ठलाच्या चेहऱ्यावर काहीसं स्मित दिसलं. त्यांना भास झाल्यासारखं वाटलं म्हणून त्यांनी निट निरखून पाहिलं, तर आज त्यांना खरंच विठ्ठलाचा चेहरा प्रसन्न दिसला. विठ्ठलाच्या चेहऱ्यावर त्यांना त्यांच्याच मनातले समाधान उमटून आलेलं दिसलं.

Thursday, July 15, 2010
सलील (तुम्ही) खरंच "दादा' आहे

मला सही..मला सही ! करत हातात वह्या घेऊन गराडा घातलेल्या शंभरावर चिमुरड्यांच्या घोळक्यात तुम्ही परवा अगदी हरवून गेला होता आणि न थकता "स्वाक्षरी' देऊन त्या प्रत्येक चिमुरडीला आनंद वाटत होतात. (स्थळ कोल्हापुरातील एक शाळा)
त्या आधी तुम्ही त्याच मुलांवर तुमच्या स्वरांनी अक्षरशः गारूड घातलं होतंत ! म्हणूनच तर सही कशासाठी घ्यायची असते ही माहित नसलेल्या त्या गर्दीतील काही चिमुरड्यांनाही "सलीलदादाची सही' त्यांच्या वहीमध्ये हवीशी झाली. त्या गर्दीतूनच माझ्या छोट्याशा मैत्रीणीनेही अगदी ढकलाढकली करत, संयोजकांचा काहीसा ओरडा खात, दप्तर सांभाळत, खूप वेळ रांगेत उभे राहत तुमची सही मिळवलीच. सही मिळाल्यानंतर "ही बघा मी सलीलदादाची सही मिळविली' हे सांगतानाचा तिचा आनंद आणि चेहऱ्यावरची चमक वर्णनातीत. (असाच आनंद सही घेतलेल्या बहुतेक सर्व चिमुरड्यांच्या चेहऱ्यांवर होता) या आनंदातच मग आमची स्वारी घरापर्यंत तुमच्या सगळ्या कार्यक्रमाचे वर्णन ऐकवत राहिली; पण माझ्या डोळ्यासमोर तिचा फक्त तो आनंदलेला चेहरा आणि तुमचं मुलांत रंगून सह्या देणं एवढंच आठवत राहिलं.
गंम्मत बघा हं ! वर्षभरापूर्वी केशवराव भोसले सभागृहात तुमचा एक कार्यक्रम आम्ही पाहिला होता. त्या वेळी आमच्या छोट्या मैत्रीणीने तुमची सही घेतली होती. ती तिच्या संग्रही आहेच, तरीसुद्धा मैत्रीणींच्या सोबत सही मिळविण्याची तिची धडपड आणि ती मिळाल्यानंतरचा तिचा आनंद शब्दातीत. तुम्ही तेथूनच तिच्यासोबत खऱ्या अर्थाने आमच्या घरी "सलीलदादा' बनून पोचला.
---
तुमच्या स्वरांची मोहिनी अवघ्या महाराष्ट्राला आहे. तुम्ही सादर केलेल्या कविता, गाणी ऐकवूनच आम्ही आमच्या प्रेमाचे, मायेचे, मैत्रीचे धुमारे रुजविले आणि फुलविले. त्याचे काही संस्कार चिमुरड्यांवर केले आणि त्याचे फळ म्हणजे आज तुमची गाणी त्यांना आत्ताच भारून टाकत आहेत. हे निर्विवाद तुमचे आणि संदीप खरे यांचे यश. यश मिळाल्यानंतर माणूस माणसांत मिसळण्याचे टाळतो असे ऐकले होते; पण त्यालाही तुम्ही परवाच्या कृतीने छेद दिलात. चिमुरड्यांच्या गर्दीत तुम्ही त्यांचे "सलीलदादा' बनून राहिलात न थकाता न टाळता त्यांना आनंद वाटत राहिलात म्हणून लिहावं वाटलं. मनापासून वाटतं तुम्ही असेच "दादा' बनून रहा. (थोडं त्रासाचं जरूर आहे.)
स्वान्त सुखाय!
Monday, June 28, 2010
मुक्काम
परवा दुपारी एक ढग
माझ्या खिडकीवर आला
त्याला पाहून चिमुकलीचा
चेहरा आनंदाने खुलला
बोबडे बोल ऐकताना
तो काहीसा रेंगाळला
वहायचं विसरून लगेच
तिच्या भेटीला धावला
एवढ्यात मागचा ढग
म्हणाला "थांबलास काय
चल, पुढचा मुक्काम
गाठायचाय लवकर'
तो हसला म्हणाला,
"सॉरी मित्रा, तू हो पुढं
माझं ठिकाण मी
मघाशीच गाठलंय!
"ती बघ ती चिमुरडी
पाहून मला आनंदलीय
माझ्या भेटीसाठी
किती आतूर झालीय!
मागचा ढग म्हणाला
"ठिक आहे, तू थांब,
पण आपल्यासाठी तिकडे
बळीराजा झुरतोय विदर्भात'
पहिला ढग ओशाळला.
"चिमुरडीकडे पाहून म्हणाला
"गडे टाटा माझा तुला
मी निघतो माझ्या मुक्कामाला'
रागावू नकोस तू माझ्यावर
गालांवर थिजले थेंब घेऊन
एक चिमुरडी बसलीय तिथे
डोळे लावून माझ्या वाटेवर
माझ्या खिडकीवर आला
त्याला पाहून चिमुकलीचा
चेहरा आनंदाने खुलला
बोबडे बोल ऐकताना
तो काहीसा रेंगाळला
वहायचं विसरून लगेच
तिच्या भेटीला धावला
एवढ्यात मागचा ढग
म्हणाला "थांबलास काय
चल, पुढचा मुक्काम
गाठायचाय लवकर'
तो हसला म्हणाला,
"सॉरी मित्रा, तू हो पुढं
माझं ठिकाण मी
मघाशीच गाठलंय!
"ती बघ ती चिमुरडी
पाहून मला आनंदलीय
माझ्या भेटीसाठी
किती आतूर झालीय!
मागचा ढग म्हणाला
"ठिक आहे, तू थांब,
पण आपल्यासाठी तिकडे
बळीराजा झुरतोय विदर्भात'
पहिला ढग ओशाळला.
"चिमुरडीकडे पाहून म्हणाला
"गडे टाटा माझा तुला
मी निघतो माझ्या मुक्कामाला'
रागावू नकोस तू माझ्यावर
गालांवर थिजले थेंब घेऊन
एक चिमुरडी बसलीय तिथे
डोळे लावून माझ्या वाटेवर
Thursday, April 22, 2010
एक वही संस्काराची

चिमुकल्यांच्या इवल्याशा हातांतून पाटीवर किंवा वहीवर "श्री' साकारतो आणि शिक्षणाचा श्रीगणेशा होतो. पहिले वहिले अक्षर उमटते आणि आयुष्याचे चित्र हळूहळू आकारू लागते. हे चित्र ज्याच्या त्याच्या वकुबाने रंगत जाते. अनेकांच्या आयुष्यात हे चित्र खूपच रंगीन, मनोवेधक, सुंदर आणि सकारात्मक असते, तर काहींच्या आयुष्यात हे चित्र फिके, रंगहीन आणि अर्धवटही राहते. मात्र, अगदी सुरवातीलाच पहिला श्री साकारतानाच जर हाती वही सोपवणारा जर संस्कारक्षम असेल, तर मग त्यांच्या आयुष्याचे चित्र नक्कीच उठावदार होते.
राजकारणात अलीकडे अपवाद वगळता अशी संस्कारक्षम, अभ्यासू आणि दूरदृष्टीने विचार करणारी आणि त्याप्रमाणे वागणारी व्यक्तिमत्त्वे अभावाने आढळतात. मुळातच अलीकडे राजकारण म्हणजे चिखलफेक, एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढणे आणि स्वतःचे उखळ कसे पांढरे होईल हे पाहणे हीच संस्कृती बनली आहे. अनेक जण या संस्कृतीचे पाईक बनले आहेत. अशा वेळी काही व्यक्तिमत्त्वांची वाटचाल वेगळ्या वाटेवरून होताना पाहणे हे वाळवंटातील मृगजळ भेटण्यासारखे आहे. कोल्हापुरातील तरुण आमदार सतेज पाटील हे तसे पक्के राजकारणी; पण त्याबरोबरच त्यांनी काही संस्कारक्षम बाबी स्वतःच्या अंगी बाणविलेल्या आहेत. एरवी राजकारणावेळी राजकारणच करणाऱ्या सतेज यांनी गेल्या काही वर्षांत आपल्या वाढदिनी भेट म्हणून वह्या स्वीकारण्याचा सुरू केलेला उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आणि अनुकरणीय असा आहे. त्यांच्या समवयस्क लोकप्रतिनिधींकडे अशाप्रकारचा संस्कारक्षम उपक्रम राबविण्याचे वेगळेपण अभावानेच दिसते. वह्या गोळा करणे आणि त्या पुन्हा होतकरू विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्या शिक्षणाला गती देण्याचे महत्त्वपूर्ण काम ते करीत आहेत. विशेष म्हणजे सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी काही वेळा असे उपक्रम सुरू केले जातात आणि कालांतराने ते केव्हा बंद पडतात, हे समजतही नाही; मात्र सतेज यांनी होतकरू विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम सुरू केला आणि गेली कित्येक वर्षे तो सातत्याने राबविला आहे. सुरवातीला एक वेगळा उपक्रम म्हणून वह्या जमा होत होत्या; पण आता मात्र त्यांच्यावरील विश्वासाने या वह्या जमा होत आहेत, हे विशेष. यंदाच्या त्यांच्या वाढदिनी पाच लाखांवर वह्या जमा झाल्या. विशेष म्हणजे यामधील काही वह्या या छोट्या दोस्तांनी आपल्या खाऊचे पैसै बाजूला काढून ठेऊन आणून सतेज यांच्याकडे मोठ्या विश्वासाने दिल्या आहेत म्हण
जेच छोट्या दोस्तांमध्ये संस्कार रुजविण्यात ते यशस्वी ठरले आहेत.
कोल्हापूरच्या परोपकारी प्रतिमेला धरूनच सतेज यांचे एकूण वर्तन आहे; मात्र आता त्याही पुढे एखादे पाऊल त्यांना टाकावे लागेल. कोल्हापूरला विकासाच्या वाटेवर नेताना अनेक सक्षम हातांना काम मिळावे, यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून ठोस प्रयत्न करण्याची अपेक्षा आहे. राजकारणाबरोबरच समाजकारण करताना अनेक संसार उभे करण्याचे, सावरण्याचे श्रेय त्यांनी मिळवावे. राजकारणात त्यांना राजकारण करावेच लागेल; मात्र त्याचबरोबर समाजकारण करताना घेतलेला वसा न टाकता तो आणखी प्रगल्भपणे कसा विस्तारत नेता येईल, हे पाहावे. तरुणांची फळी राजकारणासाठी उभी करतानाच त्यांच्या हाताला काम देऊन त्यांची कुटुंबे सावरण्याचेही काम त्यांना करावे लागणार आहे. ते तरुण आहेत. विकासाची दृष्टी त्यांच्याकडे आहे. तिचा उपयोग कोल्हापूरच्या विकासासाठी ते नक्कीच करतील. येथील तरुणांना सोबत घेऊन विकासाच्या पायवाटेचा ते महामार्ग बनवतील आणि कोल्हापूरचे स्थान जगाच्या नकाशावर ठळक बनवतील असा विश्वास वाटतो. वाढदिनी मिळणाऱ्या प्रत्येक वहीतून त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्यावर केलेले संस्कार नक्कीच ते घराघरांत पोहचवतील आणि संपन्न कोल्हापूर, संपन्न महाराष्ट्र घडविण्यात मोलाचा वाटा उचलतील. राजकारणाबरोबच समाजकारण करून ते आगळेवेगळे नेतृत्व म्हणून उदयास येतील आणि तसे त्यांनी यावे कारण तो त्यांचा हक्क आहे. त्यांच्या अशा वेगळ्या उपक्रमांमध्ये सातत्य रहावे हीच अपेक्षा.
Subscribe to:
Posts (Atom)